महाराष्ट्र न्यूज
निलंगा तालुक्यातील आंबेगाव (मसलगा) येथे सोयाबीन जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गट क्रमांक २४ मधील बालाजी विनायक भालके आणि कमलाकर विनायक भालके यांच्या शेतातील सोयाबीन बनीमला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा आरोप आहे. या आगीत अंदाजे ६० कट्टे सोयाबीन जळून खाक झाले, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींना शोधून कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा न्यायासाठी आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही देण्यात येत आहे.
Latur, Latur | Oct 22, 2026