Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
हत्या
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
dgiri8187
📍 या दशमी निमित्त आमदार संभाजी पाटील यांनी केला नवा संकल्प. दुष्काळ असेपर्यंत आमदारकीचे संपूर्ण पगार दुष्काळग्रस्त भागांना देणार माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर.
Latur, Latur
| Oct 21, 2026
MORE NEWS
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होतोय
Latur, Latur | Oct 21, 2026
अभय साळुंके यांची महत्वाची पत्रकार परिषद.
Latur, Latur | Oct 21, 2026
अभय साळुंके यांची महत्वाची पत्रकार परिषद.
Latur, Latur | Oct 21, 2026
📍अहमदपूरमध्ये शेतकरी आत्महत्येची चौथी घटना; कर्जाचा ताण आणि दुष्काळाने शेतकरी हतबल! लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात शेतकरी आत्महत्येची चौथी घटना समोर आली आहे. शिंदगी बुद्रुक येथील अरविंद नागनाथ बंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बँकांच्या कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दुष्काळामुळे सोयाबीनचे नुकसान, पाण्याअभावी उसाचे संकट आणि डोक्यावर कर्जाचा बोजा, अशा परिस्थितीत शेतकरी हतबल झाला आहे. पाच हजार रुपयांची अग्रीम मदत पुरेशी नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना मदतीची आश्वासने, तर दुसरीकडे आत्महत्यांचे सत्र सुरूच! शेतकऱ्यांना ठोस मदत कधी मिळणार आणि कर्जवसुलीच्या तगाद्यापासून दिलासा कधी मिळणार? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महाराष्ट्र न्यूज — शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आवाज!
Latur, Latur | Oct 21, 2026
📍अहमदपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी जीवन सपंवल्या ची चौथी घटना; कर्जाचा ताण, दुष्काळ आणि वसुलीच्या तगाद्याने शेतकरी हतबल! लातूर जिल्ह्यातील शेतकरी संकटांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. अहमदपूर तालुक्यात शेतकरी आत्महत्येची चौथी घटना समोर आली असून, शिंदगी बुद्रुक येथील अरविंद नागनाथ बंडे यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती समोर आली आहे. बँकांच्या कर्जाच्या हप्त्यांचा ताण सहन न झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. एकीकडे यंदाच्या दुष्काळामुळे सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर पाण्याअभावी ऊस उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. हातात उत्पन्न नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे बँकांच्या वसुलीचा तगादा... अशा दुहेरी संकटात शेतकरी भरडला जात असल्याचे चित्र अहमदपूर तालुक्यातून समोर येत आहे. चोलामंडलम होम फायनान्स, मायक्रोफायनान्स कंपन्या, जना बँक आणि इतर वित्तीय संस्थांकडून वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही वसुली सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे. या आरोपांची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीतून शेतकऱ्यांच्या संकटावर तोडगा निघणार नसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. एकीकडे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील शेतकऱ्यांसाठी सरकारची तिजोरी खुली करण्याची भाषा करतात, तर दुसरीकडे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. मग प्रश्न असा आहे की, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार? कर्जवसुलीच्या तगाद्यापासून दिलासा कधी मिळणार? आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार ठोस पावले कधी उचलणार? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी केवळ आश्वासने नव्हे, तर वेळेत आर्थिक मदत, कर्जवसुलीबाबत स्पष्ट दिलासा आणि प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.
Latur, Latur | Oct 21, 2026
उदगीर येथे रावण दहणाचा कार्यक्रम संपन्न
Latur, Latur | Oct 20, 2026
उदगीरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊस ट्रॉली पलटी; ट्रॅक्टर चालकासह सर्व सुखरूप, सुदैवाने जीवितहानी टळली उदगीर :साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची रिंग मोडल्याने टायर फुटून ट्रॉली पलटी झाल्याची घटना आज उदगीरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. ट्रॉली ऊसाने भरलेली असल्याने संपूर्ण ऊस रस्त्यावर विखुरला गेला. चौक हा शहरातील मुख्य वर्दळीचा असल्याने घटनेनंतर बराच वेळ वाहतूक खोळंबली होती आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. सुदैवाची बाब म्हणजे या भीषण वाटणाऱ्या अपघातात ट्रॅक्टर चालकासह कोणीही जखमी झाले नाही. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Latur, Latur | Oct 20, 2026
रंगकर्मीची कीर्तावणी : अभंग-भारूडातून संतविचार, उदगीरकर मंत्रमुग्ध उदगीर (प्रतिनिधी) - संतसाहित्य, वारकरी परंपरा आणि आधुनिक जीवनातील वास्तव यांचा सुरेख संगम साधत रंगकर्मी प्रतिष्ठान, उदगीरच्यावतीने छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात 'कीर्तावणी' या संगीतमय नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. अभंग, भारूड, लावणी, कीर्तन आणि बतावणीच्या माध्यमातून संतविचारांचा जागर घडविणाऱ्या या प्रयोगाने उदगीरकर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला दिलेली वैचारिक व सांस्कृतिक देणगी आणि संतविचारांची आजच्या काळातील उपयुक्तता या प्रयोगातून प्रभावीपणे मांडण्यात आली. उपरोधिक, खुसखुशीत आणि अभ्यासपूर्ण सादरीकरणामुळे केवळ मनोरंजनच नव्हे, तर विवेकजागृतीचा संदेशही रसिकांपर्यंत पोहोचला. ऋचिका खोत आणि स्वामीराज भिसे या कलाकारांच्या प्रभावी अभिनयाला संगीत, नृत्य व वादनाची उत्तम साथ लाभल्याने संपूर्ण प्रयोगातून जणू पंढरीच्या वारीचाच अनुभव रसिकांना मिळाला. या प्रयोगास माजी मंत्री आ. संजय बनसोडे, बसवराज पाटील नागराळकर, तहसीलदार राम बोरगावकर, रमेश अण्णा अंबरखाने, रामभाऊ तिरुके, जिल्हा परिषद बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे, शिक्षक नेते सर्जेराव भांगे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप मटके, डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. अनिल भिकाने, उपसभापती विक्की भोसले, बालाजी भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, सचिव प्रा. ज्योती मद्देवाड, उपाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसुल पठाण यांनी केले, तर सूत्रसंचालन अॅड. महेश मळगे यांनी केले. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी रसूल पठाण, रामदास केदार, अॅड. महेश मळगे, नीता मोरे, लक्ष्मण बेंबडे, संदीप निडवदे, मनोहर लोहारे, हणमंत केंद्रे, नागनाथ गुटे, मारोती भोसले, प्रल्हाद येवरीकर, बाबासाहेब मादळे, विशाल आदेप्पा यांनी परिश्रम घेतले.
Latur, Latur | Oct 20, 2026