हिंगणा: हिंगणा येथील सालईमेंढा तलावात बुडून दोघांचा मृत्यू
Hingna, Nagpur | May 14, 2026 हिंगणा : तालुक्यातील सालईमेंढा तलाव परिसरात बुधवारची सुटी घालविण्यासाठी गेलेल्या ५ जणांपैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. हिंगणा पोलिसांनी नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने सायंकाळी ७वाजता त्यांचे मृतदेह बाहेर काढले. आदित्य रामचंद्र चहांदे व अभिषेक अमीरचंद सिरसाम , अशी मृतकांची नावे आहेत.आकाश मतचिरके, आदित्य चहांदे आणि अभिषेक सिरसाम हे रॅमसन कंपनीमध्ये काम करतात. आदित्य आणि अभिषेक यांची नाइट ड्युटी होती.