पोलादपूर: गोरेगाव म्युझिक कॉन्सर्ट प्रकरणातील फरार आरोपीला पोलादपूर पोलिसांनी केले जेरबंद
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को ग्राउंड वर झालेल्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान दोन युवकांचा ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. यानंतर आयुष विकी साहित्य हा उल्हासनगर मधील आरोपी फरार झाला होता. रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदरावडे यांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गोवा येथे कारने जाताना आयुष साहित्य याच्यावर झडप घालून पकडण्यात आले.