जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. मार्केटमधील एका मोबाईल दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीचे मोबाईल लंपास केले, तर अन्य दोन दुकानांचे लॉक तोडून चोरीचा प्रयत्न केला असताना सेंट्रल लॉकमुळे मोठी चोरी टळली. दरम्यान, या घटनांशी संबंधित चार जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive