जाफराबाद: पोलिसांनी पकडलेला जेसीबी सुटल्यानंतर फटाके फोडत देऊळझरी येथे जेसीपी चालकाने केली पोलिसांना आव्हान
आज दिनांक 5 मे 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील देऊळझरी येथे पूर्णा नदी पात्रामध्ये 1महिन्याभरापूर्वी जाफराबाद पोलिसांनी व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करत विविध वाळू उपसा करणारा जेसीबी पकडला होता, न्यायालयाच्या आदेशावरून सुटल्यानंतर या जेसीबी चालकाने पोलीस ठाणे येथे बाहेर येत मुख्य चौकात फटाके फोडत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत पोलीस प्रशासनाला आव्हान केले आहे. सदरची घटना काल दिनांक 4 मेची असल्याचे समोर आले आहे.