अमरावती: लोखंडी कत्ता नामक शस्त्र घेऊन दहशत पसरविणारा तडीपार आरोपी नवाथे हनुमान मंदिर परिसरातून ताब्यात, राजापेठ पोलिसांची कारवाई
लोखंडी कत्ता नामक शस्त्र घेऊन लोकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या तडीपार आरोपीला 5 डिसेंबर रोजी रात्री राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. नवाथे मार्गावरील हनुमान मंदिराजवळून त्याला अटक केली.आदित्य रमेश आमट (वय 22 रा.सरोज कॉलनी ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला पंधरा महिन्यांकरिता जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याजवळील शस्त्र जप्त केले. त्याच्यावर आर्म ऍक्ट सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला,अशी माहिती 6 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता प्राप्त झाली.