पोलादपूर: आंबेनळी दुर्घटनेत बचाव पथकांचे शर्थीचे प्रयत्न
पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दाभिळ टोक जवळ झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत सोमवारी (दि.25) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले. सावित्री नदीच्या खोऱ्यातून दाभिळ गावाच्या मार्गाने दरीत उतरलेल्या बचाव पथकांनी अपघातग्रस्त स्कॉर्पिओ वाहनाजवळ पोहोचून चौथा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यामुळे आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित चार जणांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीमचे प्रयत्न अखंड सुरू आहेत.