शहादा: जयप्रकाश नारायण शेतकरी सूतगिरणीच्या चेअरमनपदी दीपक पाटील यांची निवड
लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी कमलनगर उंटावद-होळ ता.शहादा च्या चेअरमनपदी दीपक पाटील तर व्हॉईस चेअरमनपदी हरीदास सदाशिव पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकशाही आघाडीचे उमेदवार सर्व 21 जागांवर निवडून आले आहेत.शनिवारी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी सूतगिरणी साईटवर विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.