शहादा: बुडीगव्हाण येथे ॲपेरिक्षाच्या धडकेत पाच वर्षीय बालिका जागीच ठार, म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भरधाव ॲपेरिक्षाच्या धडकेतन पाच वर्षांची बालिका जागीच ठार झाल्याची घटना बुडीगव्हाण गावात २० मार्चला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मी विविसिंग दैवत असे मृत बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी ॲपेरिक्षा चालकावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. बुडीगव्हाण येथे लक्ष्मी दैवत ही बालिका अंगणात खेळत होती. त्याचवेळी एमएच १६ एएम ८३६० या क्रमांकाच्या ॲपेरिक्षाने तिला मागून धडक दिली होती.