शहादा: लांबोळा शिवारातील गट क्रमांक 24 आणि 26 मधील 750 मीटर विद्युत तार आणि मनरद शिवारातून 360 मीटर विद्युत तार चोरी
शहादा तालुक्यातील लांबोळा शिवारातील गट क्रमांक 24 आणि 26 मधील 6 हजार 480 रुपये किंमतीची 750 मीटर विद्युत तार व मनरद शिवारातील गट क्रमांक 342 मधून अज्ञात चोरट्यांनी 3 हजार 240 रुपये किमतीची 360 मीटर विद्युत चार चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे शहादा येथील कनिष्ठ अभियंता अमोल विजय मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला.