शहादा: एस.ए.मिशन प्राथ.शाळा इसाईनगर येथे व्यसनमुक्त व प्लास्टिक मुक्त होळी साजरी झाली
एस.ए.मिशन प्राथ.शाळा इसाईनगर येथे व्यसनमुक्त व प्लास्टिक मुक्त होळी साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक भानुदास गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली. व्यसमुक्ती व प्लास्टिकमुक्त होळी साजरी करण्यात आली. सर्व मुलांनी शालेय, ग्रामपंचायत परिसरातील तंबाखू व सिगरेट, प्लास्टिक गोळा करून होळीत टाकले. शाळेतील शिक्षक श्री भटू पवार यांनी मुलांना होळी ची व तंबाखू गुटखा या व्यसाना पासून होणारे नुकसान व रोग व कर्करोग यांची माहिती दिली.