पोलादपूर: रस्त्याकडेला उभ्या कंटेनरला कारची जोरदार ठोकर
मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम राहिले असून चांढवे टोल नाका येथील अपघाताची घटना ताजी असताना शनिवारी दुपारी उभ्या कंटेनर ला मागून येणाऱ्या कारची जोरदार ठोकर बसल्याने कार मधील जागीच ठार झाल्याची घटना पोलादपूर नजीक हॉटेल बालाजी जवळ घडली आहे. अनिल रावसाहेब मार्केड आपल्या परिवार सह आपल्या ताब्यातील कार एम एच 08 ए एन 2439 घेऊन मुंबई गोवा महामार्गावरून महाड बाजू कडून दापोली कडे जात असताना पोलादपूर हद्दीतील हॉटेल बालाजी जवळ आले असता रत्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनर एम एच 04 एल वाय 1638 ला जोरदार ठोकर बसली.