धुळे: आदिवासींच्या हक्कासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने साक्रीरोड परिसरातून हजारोंचा आक्रोश मोर्चा
Dhule, Dhule | Aug 29, 2024 सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने आज धुळ्यात आदिवासी हक्कांच्या संरक्षणासाठी मोठा मोर्चा काढला. आदिवासींचे हक्क काढून घेणारे वनविधेयक २०२३ रद्द करण्याची मागणी प्रमुख होती. शहरातील साक्री रोड कामगार भवनातून सुरू झालेला हा मोर्चा संतोषी माता चौक, बसस्थानक, बारा पत्थर, तहसील कार्यालय, जेलरोड आणि कमलाबाई चौक मार्गे फिरत तहसील कार्यालयाजवळ संपला. या मोर्चात महिलांसह हजारोंनी आदिवासी बांधव आणि भगिनी सहभागी झाले होते.