जाफराबाद: तहसील कार्यालयासमोर सकल बौद्ध समाज बांधवांच्या वतीने सुरू आहे बेमुदत साखळी उपोषण
आज दि.3 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी2 वाजेच्या सुमारास जाफराबाद तहसील कार्यालयासमोर जाफराबाद शहर व तालुक्याच्या वतीने सकल बौद्ध समाज बांधवांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे,याचे कारण म्हणजे राज्य सरकार अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ ब क ड वर्गीकरण करू पाहत आहे व त्याला विरोध करण्यासाठी सकल बौद्ध समाज बांधवांच्या वतीने हे साखळी उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे,जोपर्यंत सरकार हा निर्णय थांबवत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील असा इशारा या उपोषणकर्त्यांनी दिला.