शिरवळजवळ NH-48 वर भीषण अपघात! 🚨
पुणे-सातारा महामार्गावर हॉटेल शिवालयसमोर पहाटे सुमारे 1.15 वाजता भीषण अपघात झाला. साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा नेक्सॉनवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून विरुद्ध लेनमध्ये पलटली आणि समोरून येणाऱ्या आयशर ट्रकवर जोरदार आदळली.
या दुर्घटनेत मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये वेदांत अर्जुन वारिंगे, सोनलॉन्ग धीरेंद्र ठाकूर, आदित्य बाळासाहेब गरुड आणि निखिल बाळू राऊत यांचा समावेश आहे.
जखमी दीक्षित दयानंद पुजारी आणि मयूर हनुमंत शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने व मलबा हटवून वाहतूक सुरळीत केली. शिरवळ पोलीस पुढील तपास करत आहेत.
📍 शिरवळ | पुणे-सातारा महामार्ग | NH-48
#शिरवळ #शिरवळअपघात #NH48 #NH48Accident #PuneNews #PuneBreakingNews #PuneSataraHighway #PuneSatara #MaharashtraNews #MaharashtraBreakingNews #AccidentNews #RoadAccident #BreakingNews #LatestNews #Maval #TalegaonDabhade #पुणेबातम्या #महाराष्ट्रबातम्या #अपघात #महामार्गअपघात #TimesOfMaharashtra #TimesOfMaharashtraNews
Pune City, Pune | Aug 11, 2026