जाफराबाद: म्हाडा कॉलनी परिसरात शॉर्टसर्किट होऊन जळालेल्या घरांची माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी केली पाहणी
आज दिनांक 11 जून 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात शॉर्टसर्किट होऊन 10 जून रोजी जळून खाक झालेल्या घरांची पाहणी केली आहे यामध्ये गजानन अंदुरे, संजय अंदुरे, चंद्रकांत अंदुरे यांची घरी जळून खाक झाले असून संसार उपयोगी साहित्य जळाले आहे त्यामुळे या परिवाराशी संवाद साधत माहिती जाणून घेतली आहे.