समुद्रपूर: हळदगाव पाटी जवळ चालत्या ट्रकला आग: कोणतीही जीवितहानी नाही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान
नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील हळदगाव पाटी जवळ १० एप्रिलला सकाळी ७ वाजताच्या सुमारास नागपूर कडून हैदराबादकडे लोनचे भरुन जात असलेल्या चालत्या ट्रकला अचानक आग लागली.यावेळी आग लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक मधून बाहेर पडून आपला जीव वाचविला पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली हिंगणघाट येथून अग्निशमन दलाच्या पाचारण करण्यात आले.मात्र आग आटोक्यात येईपर्यंत ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले