भोसरी - आळंदी रोड येथेे मॅक्झिन चौकात मोकाट गुरांचा ठिय्या; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
भोसरी: भोसरी-आळंदी रस्त्यावरील अत्यंत वर्दळीच्या मॅक्झिन चौकात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. भररस्त्यात गाई-म्हशींचा ठिय्या असल्याने दररोज मोठी वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या मधोमध बसलेल्या जनावरांमुळे वाहनांना अचानक ब्रेक दाबावे लागत असल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, प्रशासनाने तातडीने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.
#magazinechowk #bhosari #alandiroad #pcmc #pimprichinchwad Pune, भोसरी, आळंदीरोड, पिंपरीचिंचवड, पुणे,