शहादा: लोकसभा निवडणूक आणि सन उत्सवांच्या पार्श्वभूमीवर म्हसावद गावात पोलिसांचा रूट मार्च
लोकसभा निवडणुक व सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहादा तालुक्यातील म्हसावद गावात पोलिसांनी रूट मार्च काढला होता. पोलीस स्टेशन येथुन मच्छी बाजार, बाजार चौक, बहिरोम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साई बाबा मंदिर, सरदार पटेल चौक, धनगर गल्ली, अहिल्याबाई पुतळा, ग्रामीण रुग्णालय म्हसावद, आंबाजी माता मंदिर व पोलीस ठाणे येथे समाप्त झाले. सदर रुटमार्च कामी शहादा पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार,सपोनि राजन मोरे, उपनिरीक्षक जितेंद्र , १९ पोलीस अंमलदार, १३ होमगार्ड व सीमा सुरक्षा दल प्लॉटुन राहतील.