शहादा: सारंगखेडा, बामखेडा, वडाळी, तोरखेडा परिसरात शुक्रवारी अचानक वादळ वाऱ्याचा पाऊस, फेस शाळेचे पत्रे उडाली
शहादा तालुक्यातील सारंगखेडा, फेस, बामखेडा, वडाळी, तोरखेडा परिसरात अचानक वातावरणात बदल झाल्याने वादळासह गारपिटीचा पाऊस पडल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.अधिक माहिती अशी, शहादा तालुक्यातील फेस येथील शाळेचे वादळामुळे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तोरखेडा, फेस, वडाळी परिसरात रब्बी हंगामातील काढणीवर आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळ वार्यासह पाऊस झाल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे.