शहादा: वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाच्या मागील बाजूस युवकांकडून साफसफाई मोहीम, राजपूत समाजातर्फे युवकांचे आभार
शहादा शहरातील वीर शिरोमणी-राष्ट्र गौरव श्री महाराणा प्रतापसिंह स्मारकाच्या ठिकाणी मागील बाजूस असलेली जागेची साफसफाई करून लावलेल्या फुल झाडांची कटाई करून सुव्यवस्थित करण्याचे काम केले आहे. चांगली भावना मनाशी बाळगून कार्य करणाऱ्या राजू माळी , बंटी कुमार माळी, विजय परदेशी शहादा तालुका राजपूत समाज मंडळातर्फे मनापासून कौतुक व आभार व्यक्त केले आहे.