शहादा: डामरखेडा पुलावरून मिनी बस सुरू करावी, प्रकाशा ग्रामस्थांचे उपजिल्हाधिकारी
डामरखेडा पुलावरून अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र मिनीबस सुरू करा व प्रवासी तथा विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबा या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी हरिश भामरे यांना निवेदन दिले. त्यात प्रवासी वाहतूक करणारी एस.टी .महामंडळाची बस बंद झाली आहे. यामुळे प्रवासी व विद्यार्थी सर्वांचे हाल होत आहे. उपजिल्हाधिकारींना पंडित धनराळे,नरेंद्र गुरव, आकाश झिंगाभोई,राजू साळी, अक्षय भावसार, अनिल गुरव, विनोद शिंदे, विशाल सोनार, प्रकाश वाडीले, राजू पाटील, वसंत कुंभार आदी उपस्थित होते.