समुद्रपूर: गव्हा कोल्ही पारधी बेड्यावर पोलिसांची वॉश आऊट मोहमी:५ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट
गव्हा कोल्ही पारधी बेड्यावर पोलिसांनी वॉश आऊट मोहमी राबवित तब्बल ५ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करीत ४ जणा विरुद्धात गुन्हा दाखल केला आहे.प्राप्त माहितीनुसार सण उत्सवाच्या अनुसगांने ठाणेदार संतोष शेगावकर यांनी गावठी मोहा दारू विक्रेता व वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक कारवाई सुरू केली असून याच अनुसगांने ठाणेदार संतोष शेगावकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात गावठी मोहा दारू साठा आढळून आला