समुद्रपूर: पाठर येथील योगपटू शंकर डहाके अकोला येथील रेल यात्री एकता मजदुर संघाकडून गौरव पुरस्काराने सन्मानित
पाठर या छोट्याशा गावातील योग पट्टू शंकर मारोतराव डहाके यांच्या पाण्यावर नवनवीन योग प्रयोगाची दखल घेत आज १५ फेब्रुवारीला १२ वाजता अकोला येथे रेल यात्री एकता मजदुर संघ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. योग पट्ट शंकर डहाके यांनी वयाच्या ११ ते १२ व्या वर्षापासून योगाचे नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली बाबा रामदेव हे जमिनीवरचे योग करतात म्हणून त्यांनी पाण्यात योग करणे सुरू केले.