कन्नड: नगरपरिषदेच्या व्यापारी संकुल दुर्घटनेनंतर गाळेधारकांची धावपळ; ३० गाळे केले खाली
कन्नड नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरील व्यापारी संकुलात गुरुवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. २० वर्षांपूर्वी बांधलेल्या जीर्ण इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. दुसऱ्या मजल्यावरील तीन गाळे आणि जिना खाली पडल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.शनिवारी दिवसभर दुकानदारांनी गाळ्यांमधील आपले साहित्य मिळेल त्या वाहनाने नेऊन गाळे रिकामे करण्याचे काम सुरू होते.मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी आज दि ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सांगितले की, या घटनेची वरिष्ठांना माहिती दिली आहे.