पोलादपूर: दारू पिण्यास मज्जाव केल्याने चायनीज सेंटर चालक व कर्मचाऱ्यांना मारहाण
पोलादपूर तालुक्यातील कापडे येथे चायनीज सेंटरवर दारू पिण्यास मनाई केल्याच्या कारणावरून ग्राहकांनी दुकान चालक व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.८) सायंकाळी घडली. या प्रकरणी पोलादपूर पोलिस ठाण्यात १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कापडे येथील 'प्रशांत चायनीज' या दुकानावर फिर्यादी विठ्ठल साने (वय ५५), नंदा साने, प्रतीक साने, प्रशांत साने आणि कृष्णा साने (सर्व रा. गोपालवाडी, पोलादपूर) उपस्थित होते. त्यावेळी आरोपी अजय वाघे आणि अनिल वाघे हे दुकानात आले व त्यांनी राईसची ऑर्डर दिली.