श्रीगंगानगरमध्ये रेल्वे रुळांवर संशयास्पद स्फोट; दोन सिमेंटचे खांब क्षतिग्रस्त!
राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ अनूपगढ-सूरतगढ रेल्वेमार्गावर मंगळवारी रात्री संशयास्पद स्फोटाची घटना घडली. ५० जीबी गावाजवळ झालेल्या या स्फोटात रेल्वे रुळांना आधार देणारे सिमेंटचे दोन स्लीपर ब्लॉक खराब झाले असून रुळांदरम्यान सुमारे दोन फूट खोल खड्डा पडला.
विशेष म्हणजे, अनूपगढहून सूरतगढकडे जाणारी प्रवासी ट्रेन रात्री ९ वाजता या ठिकाणाहून गेली होती. त्यानंतर सुमारे ४५ मिनिटांनी, रात्री ९.४५ च्या सुमारास स्फोट झाला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह ATS, CID, फॉरेन्सिक टीम, बॉम्बशोधक पथक आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अलीकडे सीमावर्ती भागातून जप्त करण्यात आलेल्या ७.५ किलो RDX शी या घ�