📍बोलाचा भात आणि बोलाची कढी.
📍लातूरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका
लातूर : लातूर चा पाणी प्रश्न,शहरातील रस्त्यांवरील खड्डे, रिंगरोडची दुरवस्था, गल्लीबोळातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न, अस्वच्छता आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच रस्त्यालगत पार्किंगविना उभ्या राहत असलेल्या मोठमोठ्या इमारती आणि महानगरपालिकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील हॉस्पिटल्सच्या कारभाराबाबतही नागरिकांकडून तक्रारी होत आहेत.
या विविध समस्यांकडे पालकमंत्री आणि शहराच्या आमदारांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. लातूरकरांच्या सहनशीलतेलाही मर्यादा आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्या मर्यादेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Latur, Latur | Sep 17, 2026