फलटण: फलटणमध्ये पुन्हा एकदा नगरपालिकेच्या विषयावरून राजकीय कलगीतुरा; माजी नगरसेवक अनुप शहा यांनी मुख्याधिकाऱ्यांवर डागली तोफ
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल फलटण नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांचा माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच पाठीवर कौतुकाची थाप टाकली होती. त्या पार्श्वभूमीवर खासदार गटाचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी मात्र शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकाऱ्यांवर टीकेची तोफ डागली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल आणि एकूणच कारभाराबद्दल जोरदार टीका केली आहे.