श्रीवर्धन: सागरी मच्छिमारी बंद; पोटासाठी मोलमजुरीची वेळ
हवामान खात्याकडून दरवर्षी खोलसमुद्रातील मासेमारी ३१ मे पासून बंद करण्याचे आदेश देते. परंतु ह्यावर्षी खराब हवामान असलयाने व मासळीचा दुष्काळ असल्याने मच्छिमार आपली बोट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४०० यांत्रिक बोटी किनाऱ्यावर ओढली. पुढील ३ महिने मासेमारी बंद असल्याने कोळी बांधव हैराण आहे. बोटीवरील कर्जाचे हप्ते फेडता येत नाही, मासळीचा दुष्काळ असल्याने घरात पैशाची चणचण पुढील २ महिने खायचे काय हा प्रश्न ? सद्य युवावर्ग समुद्रकिनारी रापण करून मासे पकडतात. त्यातही समुद्रात ऑइल आल्याने ती मासळीदेखील पाळली शेवटचा पर्याय म्हणून सकाळी उठून मोलमजुरीवर जाण पसंत केले आहे.