पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथुन आज सोमवार दि. ४ आॅगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजेपासून खान्देशात प्रसिद्ध मानल्या जाणाऱ्या कानबाई मातेची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. सदरची विसर्जन मिरवणूक कृष्णापुरी, जामनेर रोड या मार्गावरुन काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांनी डी. जे. च्या तालावर फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा केला. हिवरा नदी पात्रात विसर्जन करण्यात आले