पोलादपूर: रायगडमध्ये उष्णतेचा तडाखा, पुढील 3 दिवस यलो अलर्ट जारी
रायगड जिल्ह्यात तीव्र उकाड्याने हैराण केले. तर पुढील तीन दिवस रायगडसाठी तीव्र उष्णतेचे असणार असून मुंबई प्रादेशिक विभागाने 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून यामुळे तीव्र उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहेत. वायव्य भारतावर समुद्रसपाटीपासून 12.2 किलोमीटर वर उष्णतेचा पट्टा तयार झाला आहे.