जाफराबाद: पत्रकार संतोष भुतेकर यांना मारहाणीच्या निषेधार्थ तहसीलदार व पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन कारवाईची पत्रकारांची मागणी
आज दिनांक 4 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद पोलीस ठाणे व जाफराबाद तहसील कार्यालय येथे जाफराबाद तालुका सकल पत्रकार बांधवांच्या वतीने जगमित्र चे पत्रकार संतोष भुतेकर यांना 3 जून रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत यांचा शर्ट फाडला आहे यामध्ये जे पण आरोपी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशा मागणीची निवेदन आज पत्रकार बांधवांनी दिली आहे.