अमरावती: महालक्ष्मी कॉलनीतून चोरट्याने १ लाख ४५ हजारांच्या बारा बॅटऱ्या केल्या लंपास, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हायवे जवळील महालक्ष्मी कॉलनीतून चोरट्याने 1 लाख 45 हजार रुपये किमतीच्या 12 बॅटऱ्या लंपास केल्या.या घटनेची तक्रार टेक्निशियन प्रशांत अरुणराव वानखडे (वय 28) राहणार राहुल नगर यांनी चार डिसेंबर रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती 5 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता प्राप्त झाली.