घरातील शौचालयात अचानक मगर! उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये मगरीमुळे उडाली खळबळ
उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे एका घरातील शौचालयात अचानक मगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी शौचालयात गेलेल्या घरातील सदस्यांना मगर आत बसलेली दिसताच त्यांची घाबरगुंडी उडाली.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर मगरीला सुखरूप पकडण्यात आले. गावकऱ्यांच्या मते, सोहागीबरवा जंगल किंवा गंडक नदीतून ही मगर भरकटून वस्तीत आली असावी. सुटकेनंतर तिला गंडक नदीत सोडण्यात आले.
#UttarPradesh #Maharajganj #CrocodileRescue #ForestDepartment #WildlifeRescue ViralNews उत्तरप्रदेश मगर वनविभाग मगररेस्क्यू
Pune City, Pune | Nov 11, 2026