अंबरनाथ: भालगाव परिसरात एका व्यक्तीने महावितरणच्या मीटरमध्ये छेडछाड करून ३ लाख ६५ हजार ५४० रुपयांची वीज चोरी
अंबरनाथ तालुक्यातील भालगाव परिसरात राहणारे मुकुंद म्हात्रे यांनी महावितरणच्या मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल ३ लाख ६५ हजार ५४० रुपयांची वीज चोरी केली. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबरनाथ पश्चिम पोलीस करत आहेत.