अंबरनाथ: जेएनपीटी - बडोदरा एक्सप्रेस हायवेच्या कामासाठी उल्हासनदीत टाकण्यात आला मातीचा भराव
जेएनपीटी - बडोदरा एक्सप्रेस हायवेच्या कामासाठी उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात माती भराव करण्यात आला असून या माती भरावामुळे उल्हास नदीला येत्या पावसात पूर येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमदार किसन कथोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून या ठिकाणचे माती भराव काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.