अंबरनाथ: अंबरनाथ जवळील गुलशन नगर परिसरात गांजा पिणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला
अंबरनाथ जवळील गुलशन नगर परिसरात आज दुपारी दोन वाजता एक तरुण बेकायदेशीपणे गांजा पीत बसला होता मात्र या परिसरात काही नागरिक येजा करत असताना त्यांनी याबाबतची माहिती फिर्यादी म्हणून उल्हासनगर पोलिसांना दिली, उल्हासनगर पोलीस चे प्रसाद तोंडलीकर एवढ्या काही वेळातच पोहोचले आणि संतोष सोनवणे या तरुणाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उल्हासनगर पोलीस करत आहेत तसेच त्यांनी हा गांजा कुठून आणला याचा देखील तपास पोलीस करत आहेत