अंबरनाथ: अंबरनाथच्या चिखलोली रेल्वे स्थानकाच्या उभारणीची निविदा मंजूर; लवकरच प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान चिखलोली या नव्या रेल्वे स्थानकाला काही वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. मात्र या रेल्वे स्थानकासाठी भूसंपादनाची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून स्थानकाच्या उभारणीसाठी तब्बल ७४ कोटींची निविदा मंजूर करण्यात आली आहे. लवकरच त्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.