अंबरनाथ: बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ साडेचार किमीचा बोगदाचं काम ५० टक्के,बदलापूर ते पनवेल अवघ्या 15 मिनिटांत
बडोदा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या महाराष्ट्रात प्रगतीपथावर आहे. हा महामार्ग अंबरनाथ तालुक्यातल्या बदलापूरमधून जात असून आज आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर पनवेल बोगद्याची पाहणी केली असून बदलापूर ते पनवेल अवघ्या 15 मिनिटांत जाता येणार आहे,तर या बोगद्याचं काम आता 50 टक्के पूर्ण झालं आहे तर जुलै 2025 मध्ये या रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे.