पोलादपूर: बालविवाहविरोधी मोहिमेला गती; कडक कारवाईसोबत जनजागृतीवर भर : अदिती तटकरे
राज्यात गेल्या दोन वर्षांत बालविवाह रोखण्यासाठी शासनाने अधिक कडक भूमिका घेत प्रभावी कारवाई सुरू केली आहे. बालविवाहात सहभागी होणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली जात आहे. या सातत्यपूर्ण उपाययोजनांमुळे बालविवाहाच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. रायगड जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये, यासाठी महिला व बाल विकास विभागासह शासनाच्या विविध यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत.