रामटेक: आगामी एका महिन्यात श्रीराम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था रामटेक अंतर्गत ट्रस्ट बनणार
- राज्यमंत्री आशिष जयस्वाल
Ramtek, Nagpur | Jul 11, 2026 श्रीराम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था रामटेक 2026 हे विधेयक विधानसभा व विधान परिषद मध्ये मंजूर झाल्यानंतर आगामी एका महिन्यात विश्वस्त व्यवस्था ट्रस्ट तयार करण्यात येणार असून त्याद्वारे रामटेक राम मंदिरासह परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असल्याची माहिती राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी त्यांचे रामटेक येथील जनसंपर्क कार्यालयात शनिवार दि. 11 जुलैला सायंकाळी आठ वाजता दरम्यान आयोजित पत्र परिषदेत दिली.