सेलू: सोंडी शिवारात गावठी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची धाड, सुमारे सव्वा चार लाख रुपयांचा दारू साठा नष्ट
Seloo, Wardha | Nov 26, 2024 सोंडी जंगलात अवैधरित्या गावठी दारु गाळली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून ४ लाख २३ हजारांचा दारुसाठा नष्ट करुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ता. २५ सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. आशिष रॉय व महेश बंडेवार दोघेही रा. हिंगणी असे आरोपीचे नाव असून दोघेही फरार झालेत. अशी माहिती ता. २६ ला सेलू पोलिसांनी दिली.