सेलू: कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याची शहरालगतच्या मौजा बेलगाव शिवारातील बोर नदीत आत्महत्या, सेलू पोलिसांत मर्ग दाखल
Seloo, Wardha | Nov 19, 2024 कर्जबाजारीपणामुळे विवंचनेत राहणाऱ्या शेतकऱ्याने शहरालगत असलेल्या मौजा बेलगाव शिवारातील बोर नदीत आत्महत्या केल्याची घटना आज ता. 19 नोव्हेंबर मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कवडुजी डोमाजी रेवतकर वय 60 वर्ष रा. भगत लेआऊट सेलू असे मृतकाचे नाव आहे. त्यांचेवर कांढळी येथील बँक ऑफ इंडियाचे 1 लाख 60 हजार रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात आले.