सेलू: सहलीसाठी जात असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बसला हिंगणी जवळ पेंढरी घाटात अपघात; 2 विद्यार्थी ठार तर 10 ते 15 जण जखमी
Seloo, Wardha | Nov 26, 2024 पिकनिकसाठी शालेय विद्यार्थ्यांची ट्रिप घेऊन जात असलेली बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. त्यात बसमधील 2 विद्यार्थी ठार झालेत तर 10 ते 15 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात ता. 26 मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान हिंगणी नजीक पेंढरी घाटात हिंगणी-हिंगणा रोडवर झाला.