सेलू: शहरातील प्रभाग क्र. 3 मध्ये गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर सेलू पोलिसांची कारवाई, 94 हजाराचा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Nov 19, 2024 गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ता. 19 मंगळवारी सकाळी 9 वाजता सेलू येथे प्रभाग क्रमांक 3 मध्ये सेलू पोलिसांनी केली. प्रकाश पांडुरंग उईके वय 24 रा. शिवनगाव व प्रफुल दुधबडे वय 24 रा. खापरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचेवर सायंकाळी 5.30 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.