पालघर: वसई विरार महानगरपालिकेत आमदार विलास तरे यांच्या उपस्थितीत सेवा हक्क दिन साजरा, आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन
वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय येथे सेवाक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोईसरचे आमदार विलास तरे,आयुक्त अनिलकुमार पवार,अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,उपायुक्त,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. अधिकारी व नागरिक कर्मचाऱ्यांनी नागरिकांना वेळेवर पारदर्शक गुणवत्तापूर्ण सेवा पुरवण्याचा संकल्प घेत सेवा हक्क शपथ घेत नागरिकांच्या अधिकाऱ्यांचे संरक्षण व उत्तम प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी आमदारांच्या हस्ते आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.