पालघर: जिल्हाधिकारी कार्यालय येथे सेवा हक्क दिन साजरा;दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र शुभारंभ
पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेत सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी सेवा हक्क शपथ घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पालघर जिल्ह्यातील आशागड, पोमण, आमगाव, नेहरोली, चिंचघर, खडखड, सातुर्ली ग्रामपंचायत येथे आपले सरकार सेवा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.