पुणे शहर: गणेश कला क्रीडा मंदिर येथे गुरुजन गौरव समारंभ कार्यक्रम पार पडला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती
यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं चिंतामणी ज्ञानपीठ व अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीनं आयोजित गुरुजन गौरव समारंभाच्या कार्यक्रमात अजित पवार सहभागी झाले. याप्रसंगी पुणे शहरातील नामांकित व ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व श्री. अरुण फिरोदिया, श्री. विजय कुवळेकर, श्रीमती. शमाताई भाटे यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.